मुंबई

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

प्रतिनिधी

आंदोलकांनी मोर्चासाठी परवानगी घेतली नव्हती तसेच कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवर, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. महिला आंदोलकांचीही धरपकड करण्यात आली आहे. सर्वांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या या धरपकडीनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केले. मविआ सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. “पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर करून सरकार हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही मंत्रालयात धडकूच,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“पवार साहेबांनी लोकांना गूळ दाखवणे आणि फसवणे याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार आहे. महाविकास आघाडी आरक्षण देणार नाही हे जनतेला समजले असून ओबीसी समाज आता संतप्त झाला आहे,” असेही पाटील म्हणाले.

“आंदोलनासाठी परवागनी घेतली की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. सरकारकडून ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत,” असे प्रवीण दरेकर म्हणाले. मध्य प्रदेशने ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, त्याप्रमाणे महाराष्ट्राने प्रयत्न का केले नाही, असा सवालही दरेकर यांनी केला.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...