भटक्या कुत्र्यांना मुंबईबाहेर मिळणार निवारा; सांभाळ करण्याचे खासगी संस्थांना आवाहन; देखभाल केल्यास BMC रक्कम मोजणार  
मुंबई

भटक्या कुत्र्यांना मुंबईबाहेर मिळणार निवारा; सांभाळ करण्याचे खासगी संस्थांना आवाहन; देखभाल केल्यास BMC रक्कम मोजणार

भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना निवारा मिळावा, त्या कुत्र्यांची देखभाल करावी, जेणे करुन भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे शक्य होईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी खासगी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना निवारा मिळावा, त्या कुत्र्यांची देखभाल करावी, जेणे करुन भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे शक्य होईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी खासगी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

खासगी संस्थांनी भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्याची जबाबदारी घेतल्यास त्या संस्थांना प्रती कुत्रा ६० रुपये देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईतील जागेची कमतरता लक्षात घेता मुंबईबाहेरील संस्था आल्यास त्यांना काम देण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत जवळपास ९० हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानेही पालिका प्रशासनाला अनेकदा खडे बोल सुनावले आहेत.‌ अखेर मुंबईकरांची सुरक्षितता लक्षात घेत भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र शोध मोहीम हाती घेतली आहे. निवारा केंद्र उपलब्ध झाले तरी भटक्या कुत्र्यांची देखभाल कोण करणार, असा प्रश्न पालिका प्रशासनाला सतावत होता.

डिजिटल नोंद ठेवणार !

संबंधित संस्थांना जीपीएस-टॅग असलेली छायाचित्रे आणि ॲक्टिव्हिटी लॉग अपलोड करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या माध्यमातून कुत्र्यांचे स्थलांतर, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दैनंदिन देखभाल याची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे.

जागेची गरज !

भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्थांकडे एक हजार कुत्र्यांसाठी किमान २८,०६७ चौरस फूट जागा आवश्यक आहे. कुत्र्यांचे पुनर्वसन प्रभावीपणे करण्यासाठी मोठ्या भूखंडाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

...तर देखभाल !

भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना निवाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. हत्यानंतर संबंधित संस्था त्या कुत्र्यांची आयुष्यभर देखभाल, उपचार आणि संगोपन करेल. या उपक्रमामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रित करण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी