मुंबई

फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम; पालिकेला ३ कोटींहून अधिक महसूल प्राप्त

रस्ते आणि पदपथावर ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाले आणि हातगाडीवाले यांच्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या कारणास्तव उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाला फटकारले होते.

Swapnil S

मुंबई : रस्ते आणि पदपथावर ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाले आणि हातगाडीवाले यांच्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या कारणास्तव उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाला फटकारले होते. यानंतर पालिकेने २० वर्दळीच्या ठिकाणी मागील दीड वर्षात दीड लाखांहून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. आणि यांच्याकडून तब्बल ३ कोटी ११ लाख १३ हजार रुपये दंड रक्कम आकारली आहे. यामुळे पालिकेच्या महसुलात भर पडली आहे.

अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर हातगाडीवाले यांचा प्रश्न सोडविण्यात पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका तसेच पोलिसांना खडेबोल सुनावले. यादरम्यान, मुंबई महापालिकेने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात माहिती देताना मनपाने शहरातील २० जागांची यादी सादर केली. या ठिकाणांवरचे अनधिकृत फेरीवाले हटवले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी उच्च न्यायालयात दिली.

या यादीत सीएसएमटी, चर्चगेट, कुलाबा कॉजवे, दादर स्टेशन पश्चिम, एलबीएस, हिल रोड आणि कुर्ला पश्चिम, घाटकोपर स्टेशन पश्चिम, भुलेश्वर मार्केट आदी वर्दळीच्या जागांचा यामध्ये समावेश होता. या जागांनुसार मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ पासून कारवाई करायला सुरुवात केली. आणि सदर अनधिकृत फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईतून महापालिकेला सुमारे ३ कोटी ११ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी या २० वर्दळीच्या ठिकाणी कारवाईनंतरही फेरीवाल्यांची आणि हातगाडीवाल्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे मुंबई महापालिका तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना टिकेला सामोरे जावे लागत असल्याची खंत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

फेरीवाल्यांवर कितीही वेळा कारवाई केली तरी ते पुन्हा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी येत असतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

२०२४ मधील कारवाईची आकडेवारी

एप्रिल महिन्यात १४२०१, मे महिन्यात १४५२४, जून महिन्यात १५९६६, जुलै महिन्यात १६०४७, ऑगस्ट महिन्यात १३३७६, सप्टेंबर महिन्यात ११५०८, ऑक्टोबर महिन्यात ९७२०, नोव्हेंबर महिन्यात १००५६ आणि डिसेंबर महिन्यात १५०८९ इतक्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.

२०२५ मधील कारवाईची आकडेवारी

पालिकेने सदर कारवाई २०२५ सालीही तशीच सुरू ठेवली. त्यानुसार २०२५ च्या जानेवारी महिन्यात १९२५७, फेब्रुवारी महिन्यात १६५१९, मार्च महिन्यात १५५३०, एप्रिल महिन्यात १६२८१, तर मे महिन्यात १६१७८ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन