Mumbai : सल्लागार नियुक्तीवर BMC ठाम! मोडक सागर धरण बांधतानाही सल्लागार होतेच, पालिकेचे स्पष्टीकरण संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सल्लागार नियुक्तीवर BMC ठाम! मोडक सागर धरण बांधतानाही सल्लागार होतेच, पालिकेचे स्पष्टीकरण

पाणीपुरवठा प्रकल्पात डीपीआर बनवणे, १०० ते १५० खोल बोगदा बनवणे यासाठी सल्लागाराची गरज भासते. मुंबई महापालिकेकडे कर्तव्यदक्ष अभियंते आहेत. परंतु आपले अभियंते थांबतील, परंतु टीसीएस कंपनीची मोठी टीम असते. त्यामुळे किचकट प्रकल्पासाठी सल्लागार असणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा प्रकल्पात डीपीआर बनवणे, १०० ते १५० खोल बोगदा बनवणे यासाठी सल्लागाराची गरज भासते. मुंबई महापालिकेकडे कर्तव्यदक्ष अभियंते आहेत. परंतु आपले अभियंते थांबतील, परंतु टीसीएस कंपनीची मोठी टीम असते. त्यामुळे किचकट प्रकल्पासाठी सल्लागार असणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीत दिले.

दरम्यान, सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेत १० वर्षांत किती सल्लागार नियुक्त केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्या श्रद्धा जाधव यांनी यावेळी केली.

१२ मे रोजी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेतला. तसेच टाटा कन्सल्टन्सी कंपनीलाच प्रत्येक कामात सल्लागार म्हणून काम दिले जाते, असा सवाल उपस्थित केला होता. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाच्या वतीने बाजू मांडली.

जलविभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भांडुप संकुलात १९७८ मध्ये १९१० दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी मे. बिन्नी अँड पार्टनर तर मुंबई तीन अंतर्गत व पिसे पांजरापूर संकुलातील सर्व कामे १९७८-२००० मे. बिन्नी अँड पार्टनर सल्लागार होते. प्रकल्पाचे सुसाध्यता अहवाल, सर्वेक्षण, संकल्पन, निविदा तथा आराखडे तयार करणे व बोली प्रक्रिया व्यवस्थापन इत्यादी कामांसाठी प्रकल्पाच्या उद्धृत कंत्राट किमतीच्या एक टक्क्याच्या २५ टक्के किंमत देण्यात येते. समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करणे, हे इस्त्रायल कंपनीच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक कामात सल्लागाराची नियुक्ती केली जात नाही, असेही ते म्हणाले.

२००६-०७ चे उदाहरण देत बोरिवली येथील काजूपाडा येथे पाणी येत नसल्याने ३०० कुटुंबांचा मोर्चा काढला होता. त्यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर मी डिझाईन दिले आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आणि १४० कुटुंबांना हक्काचे पाणी मिळाले. त्यामुळे आपण सल्लागाराच्या जीवावर किती दिवस काम करणार, असा सवाल सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. सल्लागार म्हणून नियुक्ती करतो पण पालिका आयुक्तांपेक्षा सल्लागाराचे वेतन जास्त असते. वाशीचा पूल बांधण्यात आला तो उत्तर प्रदेश नगर निगमच्या अभियंत्यांनी. आयआयटी रुरकीच्या मुलांनी गाडी तयार केली आणि इंग्लंडची कंपनी गाडी घ्यायला आली, असेही खणकर म्हणाले.

सल्लागारांची नियुक्ती का केली जाते?

  • काही प्रकल्पांसाठी विशेष तांत्रिक कौशल्य, ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. अशी तज्ज्ञता महापालिकेच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये नेहमीच उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाते.

  • सल्लागारांच्या निवडीसाठी भारतात आणि परदेशात तत्सम प्रकल्पांचा अनुभव

  • तांत्रिक क्षमता आणि पात्र मनुष्यबळाची उपलब्धता, प्रकल्प नियोजन, रचना, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनातील कौशल्य, मोठ्या आणि गुंतागुंतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अनुभव, अशा तज्ञ्ज व्यक्तींची सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाते, असे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीवरून निवडणूक आचारसंहितेचा भंग; निर्णय घेण्यास मान्यता, मात्र जाहीर करण्यास होती मनाई

JNPA-मुंबई जलवाहतुकीच्या मार्गात बदल; गेट वे ऑफ इंडियाऐवजी 'भाऊचा धक्का' येथून प्रवासी बोटी; १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती व्यवस्था

संत तुकाराम महाराजांची पालखी २४ जुलैला पंढरपुरात; आषाढी वारीसाठी ७ जुलैला देहूतून प्रस्थान

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : अपात्र लाभार्थ्यांनी लाटले २६ हजार कोटी!

विधान परिषद निवडणूक : बंडखोरी मोडण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ; १७ पैकी ६ जागी युतीचे पारडे जड