संजय राऊत  संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC Election : शिवसेना-मनसे जागावाटप अंतिम टप्प्यात - संजय राऊत

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. या युतीमुळे दोन्ही पक्षांची ताकद दुणावली असून दोन्ही पक्षांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे आम्ही ११७ ते १२० जागा जिंकू, असा विश्वास शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. या युतीमुळे दोन्ही पक्षांची ताकद दुणावली असून दोन्ही पक्षांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे आम्ही ११७ ते १२० जागा जिंकू, असा विश्वास शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शरद पवार सोबत असावेत!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आमच्या आघाडीत असावेत, ही सगळ्यांची इच्छा आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून मुंबईमध्ये आम्ही एक चांगला फॉर्म्युला तयार केला आहे. त्यांना ज्या जागा हव्या त्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. युतीमध्ये काही जागासाठी आम्ही त्याग केला असल्या तरी व्यापक उद्दिष्ट मराठी आणि महाराष्ट्राचा विजय हाच आहे. त्यामुळे ज्या जागा मनसे आणि राष्ट्रवादीला दिल्या, त्या विद्यमान जागा आहेत. त्यामुळे आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, पण सत्तेवर आल्यानंतर त्यांना योग्य संधी दिली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुंबई मराठी माणसाचीच राहिली पाहिजे

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिच्यावर मराठी माणसाचाच अधिकार राहिला पाहिजे, असा ठाम उच्चार राऊत यांनी केला. दरम्यान, ठाण्यातील जागावाटपही पूर्ण झाले आहे. ठाण्यात शिवसेना-मनसे आघाडी आणि भाजप यांच्यातच थेट लढत होईल, असे राऊत यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीचा निर्णय दोन दिवसांत - तटकरे

मुंबई : भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत लढणार, कुठे कुठे उमेदवार उभे करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल, अशी माहिती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

नवाब मलिक कुटुंबातील तिघांना लॉटरी ?

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पते अद्याप उघडलेले नाहीत. मात्र नवाब मलिक यांच्या कुटुंबातील सना मलिक यांचे काका कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि आत्या सईदा खान यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत घराणेशाहीला प्राधान्य दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...