मुंबई

आरोग्य खात्यात ५० हजार पदे रिक्त ? आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी घेण्याचा पालिकेचा मनसुबा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक खात्यांतर्गत रुग्णालये व आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील रिक्त पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. पालिकेच्या आस्थापना अनुसूचीवर १,४५,५७३ पदे असून सध्या सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर्स व अधिकारी असे सुमारे ८५,००० कर्मचारी नागरिकांना सेवा देत आहेत.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक खात्यांतर्गत रुग्णालये व आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील रिक्त पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. पालिकेच्या आस्थापना अनुसूचीवर १,४५,५७३ पदे असून सध्या सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर्स व अधिकारी असे सुमारे ८५,००० कर्मचारी नागरिकांना सेवा देत आहेत. तर पालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे ५० हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, येत्या काळात ७५ टक्के संभाव्य पदावर कंत्राटी कर्मचारी घेण्याचा पालिकेचा मानस आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनने दिली.

सन २०२० रोजी कोरोना महामारीमध्ये काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त यांनी आरोग्य विभागातील पदे भरण्याचे मान्य केले होते. मात्र सन २०२५ च्या मध्यापर्यंत कायम कामगार, कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही.

कायम पदे भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असतानाही सदर पदे न भरता आस्थापना अनुसूचीवरील रिक्त पदे व २०२७ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे याच्या ७५% पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.

तर आरोग्य खात्याची कामे अत्यावश्यक असल्यामुळे व सदर कामकाज अविरत असल्यामुळे सदर पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कायमस्वरूपी भरण्यात यावित, जेणेकरून सध्या असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांवर होणारा अतिरिक्त ताण कमी होऊन रुग्णांनाही चांगली व सुरळीतपणे सेवा देणे शक्य होईल.

कायम पदे भरेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदे भरीत असताना एकूण आस्थापना अनुसूचीवरील रिक्त पदांचा विचार करून पदे भरण्यात यावीत, अशी विनंती युनियनने प्रशासनाला केली आहे.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार