Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली

मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी अत्याधुनिक इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग (Intraoperative Nerve Monitoring -IONM) प्रणाली खरेदी करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी अत्याधुनिक इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग (Intraoperative Nerve Monitoring -IONM) प्रणाली खरेदी करणार आहे. या प्रणालीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया पार पडत असतात. शस्त्रक्रिये दरम्यान मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय क्षेत्रात इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग ही

शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली मानली जाते. मेंदू, मणका, थायरॉईड, कान-नाक-घसा (ENT) तसेच न्यूरोसर्जरीसारख्या - गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाच्या शरीरातील महत्त्वाच्या मज्जातंतूंच्या कार्यावर सतत लक्ष ठेवण्याचे काम ही प्रणाली करते.

शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर संबंधित मज्जातंतूच्या अगदी जवळ काम करत असतात. अशावेळी चुकून मज्जातंतूला इजा होण्याची शक्यता असते. इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग प्रणालीद्वारे त्या मज्जातंतूंच्या विद्युत संकेतांवर (Electrical Signals) सतत देखरेख ठेवली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूवर ताण येत असल्यास किंवा नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्यास यंत्रणा त्वरित इशारा देते. त्यामुळे शल्यचिकित्सक आवश्यक ती खबरदारी घेऊ शकतात.

सर्वसामान्य रुग्णांनाही मिळणार सुरक्षित उपचार

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, थायरॉईड शस्त्रक्रियेदरम्यान स्वरयंत्र नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूंना इजा झाल्यास रुग्णाचा आवाज बसणे किंवा कायमस्वरूपी बदलणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये मज्जातंतूंचे नुकसान झाल्यास गंभीर शारीरिक परिणाम संभवतात. अशा परिस्थितीत ही प्रणाली रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरते. मुंबई पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आता सर्वसामान्य रुग्णांनाही पालिकेच्या रुग्णालयांत मिळणार असल्याने उपचार अधिक सुरक्षित आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी मुंबई महापालिका मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा मागवल्या आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

७१ टक्के मुंबईकर घेत आहेत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे

NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Mumbai : नाल्यात कचरा फेकला तर कारवाई; वाहनांवर जीपीएससह CCTV ची नजर