मुंबई

मिहीर शहाने पार्टी केलेल्या बारवर अखेर बुलडोझर फिरला

‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाने पार्टी केलेल्या जुहू येथील ‘व्हाईस ग्लोबल तापस बार’वर बुधवारी पालिकेचा बुलडोझर फिरला.

Swapnil S

‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाने पार्टी केलेल्या जुहू येथील ‘व्हाईस ग्लोबल तापस बार’वर बुधवारी पालिकेचा बुलडोझर फिरला. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या कारवाईत स्वयंपाकघर, वाढीव छत शेड आदी जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम पालिकेच्या के/पश्चिम अंधेरी विभागाकडून तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये जुहू चर्च मार्गावरील ‘व्हाईस ग्लोबल तापस बार’ने केलेल्या सुमार ३ हजार ५०० चौरस फुटाच्या वाढीव, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला. अतिक्रमण निर्मूलन पथकाने अंदाजे ३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम तोडले. पालिकेचे ५ अभियंते, २ अधिकारी, २० कामगार अशा मनुष्यबळासह १ जेसीबी संयंत्र, इलेक्ट्रिक ब्रेकर्स, गॅस कटर्स आदी साधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती