मुंबई

पालिका शाळा करणार स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर; गणित, इंग्रजी विषयाची गोडी लागण्यासाठी अभिनव उपक्रम

महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्या शिक्षण विभाग स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Swapnil S

मुंबई : महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्या शिक्षण विभाग स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी गोखले रोड (दादर) महानगरपालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गखोल्यांना भेट दिली. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल. तसेच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना सहजपणे कळाव्यात यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.

याप्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुंबरे तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

सर्व शाळांमध्ये स्मार्ट टेलिव्हिजन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन तसेच शैक्षणिक संकल्पना आधारित उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणित तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजनवर मांडणे शक्य होणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी १८१ शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; 'भारत सोडा' नोटिसला आव्हान

Mumbai : एफडीएचा निर्णय बचत गटांसाठी ‘तिखट’च; सुट्या मसाला विक्रीवर बंदी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पाणीकपात; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द