Mumbai : कंत्राटदाराचा परवाना स्थगित; महापालिकेकडून कठोर कारवाई (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : कंत्राटदाराचा परवाना स्थगित; महापालिकेकडून कठोर कारवाई

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारा विरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारा विरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे. महापालिकेने बजावलेल्या दुसऱ्या कारणे दाखवा नोटीसलाही कंत्राटदाराने केराची टोपली दाखवली आहे. अखेर त्याचा परवाना स्थगित केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला मुंबई महापालिकेच्या कोणत्याही नव्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

२ जुलै रोजी खैरानी रोड परिसरात मलनिस्सारण प्रचालन विभागामार्फत मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना असलम इसाक शेख हे मोबाईलवर बोलत असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. तसेच सुरक्षेतील हलगर्जीपणासाठी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही दिले होते.

प्रशासकीय कारवाई अंतिम टप्प्यात

महापालिकेने या प्रकरणात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट केले असून, चौकशी आणि प्रशासकीय कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

औषध निर्मिती कंपनीच्या परवाना निलंबनाला HC कडून तात्पुरती स्थगिती; मंत्र्यांनी अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचेही दिले निर्देश

बोरिवली-विरार लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; छेडछाडीला विरोध केला म्हणून २० वर्षीय महिलेला लोकलमधून ढकललं; डावा हात गमावला

विदर्भात द्रूतगती मार्गाचे जाळे उभारणार; १२,५०० कोटींहून अधिक खर्च