सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतोच असे गृहित धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय 
मुंबई

Mumbai : सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतोच असे गृहित धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

सरकारी डॉक्टर खासगी वैद्यकीय व्यवसाय (प्रॅक्टिस) करतोच आणि त्यातून त्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते, असे न्यायालयात परस्पर गृहीत धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने अपघात भरपाई प्रकरणात दिला.

Swapnil S

मुंबई : सरकारी डॉक्टर खासगी वैद्यकीय व्यवसाय (प्रॅक्टिस) करतोच आणि त्यातून त्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते, असे न्यायालयात परस्पर गृहीत धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने अपघात भरपाई प्रकरणात दिला. मोटर वाहन कायद्यांतर्गत विमा कंपनीने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी विमा कंपनीचे अपील अंशतः मंजूर केले. न्यायाधीकरणाने खासगी प्रॅक्टिस आणि पगाराच्या नुकसानीपोटी मंजूर केलेली अंदाजे १०.२६ लाख रुपयांची रक्कम

उच्च न्यायालयाने रद्द केली तर इतर वैद्यकीय खर्चाची मूळ भरपाई कायम ठेवली. मोटर वाहन कायद्यांतर्गत अपघाताची भरपाई मागताना संबंधित डॉक्टर खरोखरच खासगी प्रॅक्टिस करत होता आणि त्यातून त्याला उत्पन्न मिळत होते हे पुराव्यांसह सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे दावा करणाऱ्या व्यक्तीवर असते, असे न्यायमूर्ती जैन यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. जखमी झालेल्या सरकारी डॉक्टरला 'मोटर अपघात दावा न्यायाधीकरणाने' ११,७१,३९४ रुपयांची भरपाई मंजूर केली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई