Mumbai : महापौर बंगल्यावर होणार साडेतीन कोटींचा खर्च; रितू तावडे यांच्या सूचनेनुसार होणार दुरुस्त्या 
मुंबई

Mumbai : महापौर बंगल्यावर होणार साडेतीन कोटींचा खर्च; रितू तावडे यांच्या सूचनेनुसार होणार दुरुस्त्या

भायखळा येथील महापौर बंगल्याचे नूतनीकरण आणि दुरुस्त्यांवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च होणार आहे.

Swapnil S

मुंबई :  भायखळा येथील महापौर बंगल्याचे नूतनीकरण आणि दुरुस्त्यांवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च होणार आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. 

रितू तावडे यांनी महापौरपदाची जबाबदारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील ऐतिहासिक बंगल्यात प्रवेश करणे अपेक्षित होते. मात्र या बंगल्याचे नूतनीकरण करावे आणि पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये अतिरिक्त शौचालय व्यवस्था करावी इत्यादी सूचना त्यांनी केल्या. त्यांच्या आधारे एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी ३ कोटी ४८ लाख २४ हजार ९३० रुपये खर्च येणार आहे.

एक मजली इमारत, लाकडी बांधणी, ४ हजार १७३.५२ चौरस फूट जागा अशी या बंगल्याची वैशिष्ट्ये आहेत. मात्र तो महापौरांच्या इच्छेनुसार राहण्यायोग्य करण्यासाठी आणखी काही आठवडे जाणार आहेत.

दादर शिवाजी पार्क मैदानाजवळील समुद्राला लागून असलेल्या बंगल्यात इतकी वर्षे महापौर वास्तव्य करत असत. परंतु तेथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय झाल्याने भायखळ्यातील बंगल्याला महापौरांच्या निवासस्थानाचा दर्जा दिला गेला. २०२२ नंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आणि राणी बागेतील महापौर बंगला ओस पडला होता. परंतु १५ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा राणी बागेतील बंगल्याची डागडुजी व दुरूस्तीची कामे हाती घेत ती पूर्ण केली. मात्र तावडे यांनी त्यात आणखी काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यानुसार हे काम लांबणार आहे.

ही दुरुस्ती नव्याने होणार

  • बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती

  • सर्व शौचालयांचे नवीन टाईल्स, फिक्स्चर्स, डब्ल्यूसी बसवून नूतनीकरण

  • पहिल्या मजल्यावरील बेडरूमसाठी अतिरिक्त शौचालयाची व्यवस्था

  • तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूम

  • पुरातन पद्धतीची झुंबरे व प्रकाशयोजना

  • तळमजल्यावरील सभागृहाचे बैठकीच्या खोलीमध्ये रुपांतर

  • अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्णपणे नूतनीकरण

  • तळमजल्यावर इटालियन मार्बल्सनी संपूर्ण फरशीचे नूतनीकरण

  • पुरातन पद्धतीचे व्हेनेशियन पडदे

  • तळमजल्यावर अतिरिक्त शौचालय

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च