कोकणसाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या; CSMT आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार (संग्रहित फोटो)
मुंबई

कोकणसाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या; CSMT आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार

उन्हाळी हंगामातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : उन्हाळी हंगामातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावतील.

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गावी आणि पर्यटनाकरिता नागरिक मोठ्या संख्येने जातात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसी विशेष गाडीच्या ४ सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

गाडी क्र. ०११२९ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० व १४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष ही गाडी मडगाव येथून १० व १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सुटेल.

कुठे थांबणार?

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा असेल.

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई

Mumbai : घाटकोपर रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिलांच्या शौचालयात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

Mumbai : पवई, भांडुपमधील १८९ झाडे बाधित; हरकती, सूचना नोंदवा; BMC चे आवाहन

Mumbai : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटन

Jalgaon : तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन; १८ वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया