मुंबई

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेने उपनगरी विभागांवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई: मध्य रेल्वेने उपनगरी विभागांवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ वाजल्यापासून दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या माटुंगा स्थानकापासून मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यानंतरच्या जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ वाजल्यापासून दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. पनवेल ते वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

ट्रान्स-हार्बरवर या कालावधीतील गाड्या रद्द

पनवेल येथून सकाळी ११.०२ वाजल्यापासून दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या तसेच ठाणे येथून सकाळी १०.०१ वाजल्यापासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता

CJP Protest : अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या कार्यकर्त्यांना विमानातच घेतले ताब्यात; आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Thane : भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय जनमोर्चा; पूर्णेकर कुटुंबीयांचा सहभाग, महापालिका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप