सेंच्युरी मिल प्रस्तावावरून पालिकेत आरोप-प्रत्यारोप; तत्कालीन आयुक्तांनी निवृत्तीच्या आदल्या दिवशी घाईघाईने प्रस्ताव मंजूर केले 
मुंबई

सेंच्युरी मिल प्रस्तावावरून पालिकेत आरोप-प्रत्यारोप; तत्कालीन आयुक्तांनी निवृत्तीच्या आदल्या दिवशी घाईघाईने प्रस्ताव मंजूर केले

लोअर परळ येथील सेंच्युरी मिलच्या महापालिकेच्या जागेचा विकास करून रहिवासी संकुल उभारण्यासाठी पेडर रियल्टी लिमिटेडची निवड करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : लोअर परळ येथील सेंच्युरी मिलच्या महापालिकेच्या जागेचा विकास करून रहिवासी संकुल उभारण्यासाठी पेडर रियल्टी लिमिटेडची निवड करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर मंजूर केला. या प्रस्तावाच्या निविदा प्रक्रियेपासून ते तत्कालीन पालिका आयुक्तांनी तो मंजूर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या सदस्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रस्तावामागे 'अदृश्य असल्याचा शक्ती' आरोपही करण्यात आला.

शिवसेना (उबाठा) चे नगरसेवक तथा सुधार समिती

सदस्य सचिन पडवळ यांनी निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला. या कामासाठी पाच जण सहभागी झाले असताना चार अर्ज रद्द करून केवळ एका कंपनीची निवड करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनीही प्रस्तावाला विरोध केला. फेरनिविदा काढल्यास महापालिकेला सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळाला असता, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

६५० पात्र रहिवाशांना ४०५ चौ. फुटांची घरे

सेंच्युरी मिलची जागा ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून, या जागेवर रहिवासी संकुल उभारले जाणार आहे. प्रकल्पात ६५० पात्र रहिवाशांना प्रत्येकी ४०५ चौरस फुटांची घरे उपलब्ध करण्यात येईल. पहिल्या ३० वर्षांसाठी खुल्या जमिनीचे तसेच त्यावरील बांधकामाचे भाडेपट्टा शुल्क प्रति चौरस मीटर प्रतिवर्ष एक रुपया ठेवण्यात आले आहे. पुढील ३० वर्षांसाठीचे भाडेपट्टा शुल्क त्या वेळच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित केले जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्र्यांची 'नसबंदी' वेगाने करा! उच्च न्यायालयाचे आदेश