दादा भुसे संग्रहित छायाचित्र
मुंबई

मानहानीच्या खटल्यातील आदेशाला आव्हान; कॅबिनेट मंत्री भुसे यांना नोटीस

शिवसेनेचे (शिंदे गट) कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सत्र न्यायालयाच्या आदेशाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हान याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सत्र न्यायालयाच्या आदेशाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हान याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी दादा भुसे यांना नोटीस बजावत याचिकेची सुनावणी २५ फेब्रुवारीला निश्चित केली.

सामनामध्ये २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे आपली बदनामी झाली, असा दावा करीत कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात कागदपत्र सादर करण्याची परवानगी द्या, अशी विनंती राऊत यांनी केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्या विरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयाचे याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी राऊत यांच्यावतीने ॲड. यशोदीप देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने दादा भुसे यांना नोटीस बजावत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब