मुंबई

बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना चलो अॅप बंधनकारक

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता डिजिटल प्रणालीचा वापर वाढवला आहे

प्रतिनिधी

मोफत प्रवास करणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना आता चलो अॅपवर तिकीट अनिवार्य करण्यात आले आहे. चलो अॅप डाऊनलोड केल्यानंतर कर्मचारी असा पर्याय निवडून बेस्ट बस वाहकाच्या हातात असलेल्या मशीन समोर मोबाईल धरल्यानंतर मशीन मध्ये तिकीट डाऊनलोड होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नसून मशीन मध्ये तिकीट न दिसल्यास कर्मचाऱ्यांकडून दंड आकारण्यात येईल, असे परिपत्रक बेस्ट उपक्रमाने जारी केले आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता डिजिटल प्रणालीचा वापर वाढवला आहे. प्रवाशांसाठी चलो अॅप विकसीत केला असून प्रवासी चलो अॅपला पसंती देत आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा निर्णयाला विरोध

प्रवाशांना सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता कर्मचाऱ्यांना चलो अॅप बंधनकारक केला आहे. चलो अॅप डाऊनलोड केल्यानंतर कर्मचारी हा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर कर्मचारी बेस्ट बसने प्रवास करत असताना वाहकाकडे असलेल्या तिकीट मशीन समोर मोबाईल धरल्यानंतर मशीन मध्ये तिकीट डाऊनलोड होणार आहे. मात्र ओळखपत्रावर प्रवास केल्यास तिकीट तपासणीसने कर्मचाऱ्याला तिकीट विचारले आणि मशीन मध्ये तिकीट दाखवत नसल्यास संबंधित कर्मचारी विना तिकीट प्रवास करत असल्याची नोंद घेत दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून पूर्वी प्रमाणे ओळखपत्रावर प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचारी प्रवास करतात त्याची नोंद बेस्ट उपक्रमाकडे रहावी, यासाठी कर्मचाऱ्यांना चलो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. कर्मचारी चलो अॅप डाऊनलोड करत असून चलो अॅप डाऊनलोड केले तरी कर्मचाऱ्यांना प्रवास मोफतच आहे. त्यामुळे फक्त कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची नोंद रहावी हा उद्देश आहे.

- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन