न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन; समान कामासाठी समान वेतन व उच्च न्यायालयाप्रमाणे वेतनश्रेणी वाढीची मागणी 
मुंबई

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन; समान कामासाठी समान वेतन व उच्च न्यायालयाप्रमाणे वेतनश्रेणी वाढीची मागणी

महाराष्ट्र राज्य न्यायालय कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुधवारी महाराष्ट्रातील सर्व संबंधित दुय्यम न्यायालयांमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य न्यायालय कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुधवारी महाराष्ट्रातील सर्व संबंधित दुय्यम न्यायालयांमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले.

‘समान काम, समान वेतन’ तसेच उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी महासंघाने यापूर्वीच शासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे. त्याच आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून एक दिवस काळ्या फिती लावून नियमित कामकाजावर उपस्थित राहण्याचे आंदोलन करण्यात आले.

मुंबईमध्ये या आंदोलनाला विशेषतः मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, मुंबई तसेच त्यांच्या अधिपत्याखालील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालये, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, लघुवाद न्यायालय, कुटुंब न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तपासणी, निदान अन् वेळीच उपचार; प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचे बळकटीकरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर

चंद्रा हवेत, चंद्रा नकोत; टाटा सन्सची मान्यता, टाटा ट्रस्टचा विरोध, शेअर बाजारात नोंदणी प्रक्रिया सुरू करणार

Mumbai : सायन पुलाला नवी तारीख; फेब्रुवारीत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन

सोने खरेदीत ग्राहकांचे ‘थांबा, वाट पाहा’ धोरण; जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून उघड

Mumbai : पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा; २ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी