मुंबई

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगार आटोक्यात

सुरक्षेत वाढ करत रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे हद्दीत गस्त देखील वाढवण्यात आली आहे.

देवांग भागवत

रेल्वे प्रवासावेळी दिवसागणिक घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमुळे प्रवाशांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण पाहायला मिळते. यामध्ये चोरी, खून, बलात्कार अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमुळे महिला प्रवाशांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे. मात्र या सर्व घटना गांभीर्याने घेत रेल्वे पोलिसांनी गुन्हे रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न करत अशा गुन्हेगार टोळक्याना जेरबंद करण्यात आले आहे. तर सुरक्षेत वाढ करत रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे हद्दीत गस्त देखील वाढवण्यात आली आहे.

रेल्वे प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून पाहिला जातो. लाखो प्रवासी रेल्वेतून प्रतिदिन प्रवास करतात. याचाच गैरफायदा घेत प्रवासावेळी अथवा रेल्वे हद्दीत चोरी, खून, बलात्कार, दरोडे यांसारख्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामध्ये मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्काराबरोबरच चोरी, दरोडे, गंभीर स्वरूपाचे दरोडे, विनयभंग, चेन, पाकीट व मोबाइल चोरी, बॅग चोरी, किरकोळ वाद इत्यादी गुन्हेही घडतात.

मात्र २०१९ पासून रेल्वे परिसरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे हद्दीत जीव गमावणाऱ्या प्रवासी संख्येत देखील घट झाली आहे. २०१९ मध्ये १ हजार ३२२ प्रवाशांनी रेल्वे अपघातात जीव गमावला होता. तर जून २०२२ पर्यंत १ हजार १९६ प्रवाशांनी आपला जीव गमावल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु मुख्य कारण म्हणजे अनेक विक्रमी गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्यात आल्याने सर्वाधिक गुन्हे घडणे थांबल्याचे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार