जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा 
मुंबई

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) ते नवीन जोड मार्ग (पहिला टप्पा) या प्रस्तावित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा निर्माण करणाऱ्या ओशिवरा परिसरातील ८७ बांधकामांचे मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून मंगळवारी निष्कासन करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) ते नवीन जोड मार्ग (पहिला टप्पा) या प्रस्तावित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा निर्माण करणाऱ्या ओशिवरा परिसरातील ८७ बांधकामांचे मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून मंगळवारी निष्कासन करण्यात आले. उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगर-पालिकेकडून जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) ते नवीन जोड मार्ग (पहिला टप्पा) या प्रस्तावित ‘मिसिंग लिंक’साठी कामकाज सुरू आहे. या प्रकल्पाचा टप्पा-१ आणि २ पूर्ण झाल्यानंतर बेहराम बाग परिसरातील उत्तर-दक्षिण वाहतुकीच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच, वीरा देसाई विस्तारित मार्ग त्याचप्रमाणे बेहराम बाग मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

२९ पात्र, ५८ अपात्र बांधकामे पाडली

या मार्गाच्या बांधकामात ओशिवरा परिसरातील बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे, सदर ८७ बांधकामांवर मंगळवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये ८६ निवासी आणि एका व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. यापैकी २९ पात्र बांधकामे असून ५८ अपात्र बांधकामे आहेत.

‘के पश्चिम’ प्रशासकीय विभागांतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन, विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली. २ पोकलेन, ३ जेसीबी आणि अन्य वाहनेही या कारवाईत कार्यरत होती. ओशिवरा पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड