मुंबई

महापरिवर्तन ऐतिहासिक- देवेंद्र फडणवीस

'आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे. आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले.

Swapnil S

मुंबई : 'आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे. आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले. आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगालमधील भारतातल्या जना जनाचा हा विजय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. दरम्यान, निवडणुकीतील यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी झालमुडी अर्थात भेळ खाऊन व गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.

अमितभाईच चाणक्य - शिंदे

पाच राज्यांपैकी ३ राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीए जिंकली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. लोकांनी विश्वास दाखवला आहे. बंगालचा विजय ऐतिहासिक आहे, घवघवीत यश मिळाले आहे. पश्चिम बंगालमधील भय, दहशत आता संपल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ममतादीदींचे भय संपले आणि मोदीजींचा विश्वास जिंकल्याचे ते म्हणाले. अमित शाह हे मागील १० वर्षांपासून पक्ष वाढीचे काम करत होते. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. अमितभाई खरे चाणक्य आहेत हे सिद्ध झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म या राज्यात झाला. त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन