प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

Open Network for Digital Commerce (ONDC) च्या माध्यमातून Cityflo ने मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा आपल्या ॲपमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे...
प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबई आणि दिल्लीतील मेट्रो प्रवाशांसाठी आता तिकीट बुकिंग आणखी सोपे होणार आहे. Cityflo ॲपवरून थेट मेट्रोचे QR तिकीट बुक करता येणार असून, ही सुविधा ONDC च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एकेरी किंवा परतीचे तिकीट बुक करून स्थानकाच्या प्रवेशद्वारावर QR कोड स्कॅन करता येणार आहे. विशेष म्हणजे, एका व्यवहारात सहा तिकिटांपर्यंत बुकिंग करता येणार असून सुरुवातीला अतिरिक्त बुकिंग शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवासाचे नियोजन एका ॲपवर

Open Network for Digital Commerce (ONDC) च्या माध्यमातून Cityflo ने मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा आपल्या ॲपमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्ग शोधण्यापासून तिकीट बुकिंगपर्यंतची प्रक्रिया एकाच ॲपवर करता येणार आहे.

मुंबईतील 'या' मेट्रो मार्गांचा समावेश

या सुविधेत मुंबई मेट्रोच्या लाइन १, २ए, ७, ९ आणि ३ (ॲक्वा लाइन) तसेच दिल्ली मेट्रो नेटवर्कचा समावेश आहे. प्रवासी एकेरी किंवा परतीचे QR तिकीट बुक करू शकतात.

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट
Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

तिकीट बुक करा आणि थेट QR कोड दाखवा

ॲपवरून तिकीट बुक केल्यानंतर मिळणारा QR कोड मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्कॅन करता येईल. एका व्यवहारात सहा तिकिटांपर्यंत बुकिंग करता येणार आहे. सुरुवातीला यासाठी कोणतेही अतिरिक्त बुकिंग शुल्क आकारले जाणार नाही.

बस-मेट्रो प्रवासही होणार सोपा

Cityflo ची MMRCL सोबत आधीपासून भागीदारी आहे. ॲक्वा लाइनच्या स्थानकांपर्यंत प्रवाशांना जोडण्यासाठी कंपनीच्या फीडर बस सेवा सुरू आहेत. आता त्याच ॲपवर मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा मिळाल्याने बस आणि मेट्रो असा एकत्रित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट
UPI Payment साठी इंटरनेटची गरज नाही! २००० रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहाराची सुविधा, जाणून घ्या...

प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार

MMRCL चे संचालक आर. रमणा यांनी सांगितले की, फीडर बस आणि मेट्रो तिकीट बुकिंग एकाच प्लॅटफॉर्मवर आल्याने दैनंदिन प्रवास अधिक सोपा होईल. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील.

'संपूर्ण प्रवास सोपा करणे हे उद्दिष्ट'

Cityflo चे सहसंस्थापक आणि CBO ऋषभ शाह यांनी सांगितले की, कंपनी स्वतःला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग मानते. मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करणे हे त्याच भूमिकेचे पुढचे पाऊल आहे. प्रवाशांचा संपूर्ण प्रवास अधिक सोपा करणे हे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेगवेगळ्या ॲप्सची गरज कमी

ONDC च्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक तिकीट बुकिंगची सुविधा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे बस आणि मेट्रो असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटासाठी वेगवेगळ्या ॲप्समध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in