मुंबई

वटेश्‍वर शंकर मंदिरातील चोरीने भाविकामध्ये संताप

अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता

devops@quintype.com

मुंबई : भांडुप परिसरातील वटेश्‍वर शंकर मंदिरात सोमवारी सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटीतील सुमारे तीस हजाराची कॅश पळवून नेली. या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

भांडुपच्या ड्रिम्स कॉम्प्लेक्समध्ये वटेश्‍वर शंकर मंदिर आहे. सोमवारी सकाळी सात वाजता एका स्थानिक रहिवाशाला मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मंदिरात प्रवेश केला असता, मंदिरातील सीसीटिव्ही फुटेजचे नुकसान करून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील सुमारे तीस हजार रुपयांची कॅश पळवून नेली होती. हा प्रकार उघडकीस येताच मंदिराच्या ट्रस्टीने ही माहिती भांडुप पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ट्रस्टीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. मंदिरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती