VSR वर कारवाई; अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ॲक्शन मोडमध्ये; चार विमानांच्या उड्डाणावर बंदी 
मुंबई

VSR वर कारवाई; अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ॲक्शन मोडमध्ये; चार विमानांच्या उड्डाणावर बंदी

अनेक नियमभंग आणि प्रक्रियात्मक त्रुटी आढळल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीच्या चार विमानांना तत्काळ उड्डाणास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता.

Swapnil S

मुंबई : अनेक नियमभंग आणि प्रक्रियात्मक त्रुटी आढळल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीच्या चार विमानांना तत्काळ उड्डाणास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ‘डीजीसीए’ने ही पहिली मोठी कारवाई केली आहे.

अजित पवार हे ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना त्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी चहुबाजुंनी वातावरण प्रचंड तापलेले असताना ‘डीजीसीए’कडूनही तपास केला जात होता. विविध संस्थांकडून याप्रकरणी तपास सुरू असतानाच ‘डीजीसीए’ने आता ‘व्हीएसआर’च्या ४ विमानांच्या उड्डाणावर बंदी घातल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. ‘लेअरजेट ४०/४५’ या मॉडेलच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ‘डीजीसीए’ने व्हीटी - व्हीआरए, व्हीटी - व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही, ‘व्हीटी-टीआरआय’या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. सततची ‘एअरवर्दिनेस’ मानके पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत ही मनाई कायम राहील, असे ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ कंपनीवर गंभीर आरोप केले जात होते. तपास यंत्रणांनी अपघातग्रस्त विमानाची तपासणी केली. तसेच विमानाचा डेटा गोळा करण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले होते. याबाबतचे वेगवेगळे दावे, आरोप केले जात होते. त्यानंतर ‘डीजीसीए’कडून ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानांचे ऑडिट केले जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यानुसार आता ‘डीजीसीए’कडून ऑडिट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘डीजीसीए’ने ‘व्हीएसआर’ कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणावर बंदीसुद्धा घातली आहे. व्हीएसआर’ कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. या बहुविषयक तपासणी पथकाने एअरवर्दिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्स या क्षेत्रांत मंजूर प्रक्रियांचे पालन न झाल्याच्या अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या, असे ‘डीजीसीए’ने निवेदनात म्हटले आहे.

तसेच, संबंधित क्षेत्रांत आढळलेल्या त्रुटींवर मूळ कारणांचा (रूट कॉज) सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ला ‘डेफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म्स’ जारी करण्यात आले आहेत. हे सादरीकरण तपासल्यानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल, असे ‘डीजीसीए’ने सांगितले.

दरम्यान, २८ जानेवारीच्या ‘लिअरजेट ४५’ अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल ‘एएआयबी’कडून २८ फेब्रुवारीपूर्वी येण्याची अपेक्षा आहे. या अपघाताबाबत काही स्तरांतून कटकारस्थानाची शक्यता असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘व्हीएसआर’ कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

‘डीजीसीए’कडून कंपनीच्या विमानांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये ‘व्हीएसआर’ कंपनीच्या चार विमानांमध्ये देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचे ‘डीजीसीए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीकडून हवाई सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया