मुंबई

...म्हणून धारावीकरांची बेस्टच्या विद्युत केंद्रावर झुंबड; नाव, पत्ता बदलणे, थकित रक्कम भरण्यासाठी गर्दी!

Swapnil S

मुंबई : पुढील काही वर्षांत धारावीचा चेहरामोहरा बदलणार आहे. अदानीच्या माध्यमातून धारावीचा विकास होणार असून धारावीकरांना १० बाय १० च्या घरातून थेट ३०० चौरस फुटाच्या घरात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे घर नावावर करणे, पत्ता बदलणे, वीज कनेक्शन नावावर करणे यासाठी धारावीकरांची बेस्टच्या वडाळा वीज बिल भरणा केंद्रावर झुंबड उडाली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट होणार आहे. सात लाख वस्ती असलेल्या धारावीत कामगार वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. धारावीत लेदर वर्कचा (चामड्यापासून वस्तू बनवणे) मोठा बिझनेस असून लहान-मोठे अनेक व्यवसाय धारावीत सुरू आहेत. त्यामुळे वीज कनेक्शन ही प्रत्येकाची गरज आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या आकडेवारीनुसार धारावीत १ लाख ७७ हजार ८०६ अधिकृत वीज ग्राहक आहेत. परंतु येथील लोकसंख्या ७ लाखांच्या घरात असल्याने उर्वरित धारावीकरांनी वीज कनेक्शन घेतले कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाचे १० लाख ५१ हजार ६३७ वीज ग्राहक आहेत.

विभागनिहाय वीज ग्राहक

  1. ए वॉर्ड - ७४,७७८

  2. बी वॉर्ड - ७९,९१२

  3. सी वॉर्ड - ७९,८२७

  4. डी वॉर्ड - १,४३,६७६

  5. ई वॉर्ड - ९९,२१९

  6. जी साऊथ - १,२४,६२७

  7. जी उत्तर - १,७७,८०६

  8. एफ साऊथ - १,११,४८८

  9. एफ नार्थ - १,६०,२८५

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस