मुंबई

धारावीतील व्यावसायिकांना मिळणार अतिरिक्त जागा; केवळ बांधकाम शुल्क भरावे लागणार, २४ ऑगस्टपर्यंत मुदत

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने (डीआरपी) एक खुशखबर दिली आहे. पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या २२५ चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या व्यावसायिकांना घेता येणार आहे.

Swapnil S

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने (डीआरपी) एक खुशखबर दिली आहे. पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या २२५ चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या व्यावसायिकांना घेता येणार आहे. त्यासाठी पात्र गाळेधारकांकडून केवळ अतिरिक्त क्षेत्रफळाच्या बांधकामाचा खर्च वसूल केला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत संमतीपत्र दाखल करण्याचे आवाहन डीआरपीच्या वतीने करण्यात आले आहे.

१ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वी तळमजल्यावर अस्तित्वात असलेल्या धारावीतील व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारकांना या अतिरिक्त क्षेत्रफळ उपलब्ध करून देणाऱ्या सशुल्क योजनेत सहभागी होता येईल. मात्र, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त झालेला गुमास्ता परवाना, बेस्ट प्राधिकरणाने बसवलेले एल टी -।। मीटर असे दस्तावेज गाळेधारकांना सादर करावे लागतील.

मालकी हक्काचा गाळा नसूनही भाडेकरारावर धारावीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना देखील पुनर्विकासात सामावून घेण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.

५ वर्षे राज्य वस्तू व सेवा करातून सूट

धारावी पुनर्विकासाच्या निविदेतील अटींनुसार, धारावी अधिसूचित क्षेत्रातील (डीएनए) पुनर्वसित तसेच नव्या व्यावसायिकांना ५ वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून (एसजीएसटी) सूट देण्यात येणार आहे. याशिवाय, जागेचा मालकी हक्क मिळाल्याने भविष्यात व्यवसायवृद्धीसाठी गाळेधारकांना सुलभतेने कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद