मुंबई

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी 'त्या' व्यक्तीवर केला गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर आता बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असलेल्या दिपाली सय्यद यांच्यावर काही दिवसनपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानसाठी संबध असल्याचा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केले होते. यावरून आता दिपाली सय्यद यांनी त्यांच्यविरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या की, "माझ्यावर आणि माझ्या संस्थेवर जे आरोप करण्यात आले आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांना मी माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेताना पकडले आहे." असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१९पर्यंत भाऊसाहेब शिंदे हे दिपाली सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज पाहत होते. त्यानंतर २०१९मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब शिंदे यांनी आरोप केले होते की, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानची संबंध असून त्यांचा अंडरवर्ल्डशी संपर्क आहे. तसेच, त्यांची दुबई आणि लंडनमध्ये त्यांची मालमत्ताही आहे. तसेच, दिपाली सय्यद यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा गंभीर आरोपही केला होता.

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन