मुंबई

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर ठाम असले तरी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचे समोर आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर ठाम असले तरी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचे समोर आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत वेळकाढूपणा करणाऱ्या राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

८ जून २०२० रोजी एका १४ मजल्याच्या इमारतीवरून पडल्याने दिशा सालियनचा मृत्यू झाला. केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला.

न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

राज्य सरकारने भूमीका मांडण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितल्याने न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. घटनेच्या पाच वर्षांनंतर दाखल झालेल्या या याचिकेवर राज्य सरकारला दोन आठवड्यात तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब केली.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश