मुंबई

Diwali 2024: फटाके फोडण्याची मर्यादा रात्री १० पर्यंत; प्रदूषण कमी होईल याची खबरदारी घ्या, BMC चे आवाहन

दीपावली सणामध्ये नागरिकांनी फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा...

Swapnil S

मुंबई : मुंबईकर नागरिकांच्या सदसद्‌विवेकबुद्धिवर विसंबून राहत महानगरपालिकेने यंदा दिवाळीच्या निमित्ताने आवाहन केले आहे की, कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत आणि फटाके फोडण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास मुंबईतील हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली होती. फटाके फोडण्यावर सरसकट बंदी घालण्यास न्यायालायने नकार दिला होता. पण त्यावेळी न्यायालयाने आदेश दिले होते की, दिवसात तीन तास एवढ्या मर्यादित काळात फटाके फोडले जावेत. त्यानुसार, सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत फटाके फोडण्यास हरकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. इतकेच नाही, तर मुंबईतील हवेचा दर्जा आणखी खालावला जाऊ नये, यासाठी बांधकामाचे साहित्य वाहून नेणारी वाहने ताडपत्रीने झाकण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. नागरिक रात्री दहाच्या नंतर फटाके फोडणार नाहीत, याची खबरदारी महानगरपालिकेने घ्यावी, असेही त्या वेळी न्यायालयाने नमूद केले होते.

यंदा विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत असताना महापालिकेने नागरिकांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण मुंबईकरांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेष करून लहान मुलांची जास्‍त काळजी घ्यावी. ध्वनी विरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनी प्रदूषण होते. प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्यास दिवाळीचा आनंद अधिक चांगल्‍या रितीने घेता येईल.

प्रदूषण नियंत्रणासंदर्भात महानगरपालिकेच्‍या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्‍या अनुषंगाने दीपावली सणामध्ये नागरिकांनी फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे देखील महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.

पालिकेचे आवाहन

-दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. ध्वनी व वायू प्रदूषण टाळावे.

-ध्वनीविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.

-कमीत कमी वायू प्रदूषण करणारे फटाके फोडावेत.

-फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी.

-ज्येष्ठ नागरिक व हृदयरुग्णांप्रति जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे.

-सुरक्षिततेस सर्वोच्च महत्त्व द्यावे.

-गर्दीची ठिकाणे, अरुंद गल्‍ली यांसारख्‍या ठिकाणी फटाके फोडू नयेत.

न्यायालयाकडून दखल

गेल्या वर्षी प्रदूषणाची दखल न्यायालयाने घेतली होती. तेव्हा फटाके फोडण्यावर सरसकट बंदी घालण्यास नकार देत दिवसाला तीन तास एवढ्या मर्यादित काळात फटाके फोडले जावेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी