मुंबई

मैत्रेय संस्थेमार्फत म्हाडा वसाहतीत दिवाळी उत्साहात

नवशक्ती Web Desk

मुंबई : चांदिवली येथील मैत्रेय या संस्थेमार्फत म्हाडा वसाहतीत गणेश मैदान येथे दिवाळी पहाट २०२३ आयोजित करण्यात आली होती. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, या कार्यक्रमासाठी चांदिवली म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.

कार्यक्रमास नगरसेवक ईश्वर तायडे, सोमनाथ सांगळे, भारत विकास परिषदेचे सर्वश्री महेश, डॅा. तुलारा व त्यांचे सहकारी, अशोक काचळे व विनायक कुंभार तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमासाठीचे संयोजक, मुख्य प्रायोजक, सहप्रायोजक, देणगीदार, सर्व संस्थांचे पदाधिकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे यांनी उपस्थित समुदायास दीपावलीच्या शुभेच्छा देतानाच म्हाडा कॉलनीत करण्यात येत असलेल्या विकास योजनांची माहिती दिली. तसेच काही समस्या असल्यास म्हाडा कॉलनीचे अध्यक्ष रवींद्र नेवरेकर, राजेंद्र क्षीरसागर, संतोष नागेकर याचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले व सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साफल्य मित्र परिवाराचे कार्यकर्ते व मैत्रेयचे संस्थापक मंडळ सर्वश्री भालचंद्र काबाळे, प्रमोद कोलप्ते, सुनिल लाड, अरुण सावंत, विनायक वाघ, दिलीप भदरगे, संजय कांबळे, डॅा चंद्रशेखर रेड्डी, डॅा सुभाष पवार, हेमंत पालकर, मारुती साळुखे, राजेंद्र क्षीरसागर, संतोष नागेकर व रविंद्र नेवरेकर हे दिवस रात्र झटत होते. दिवाळी पहाटचा आनंद लुटण्यासाठी विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस