घरकामगार ‘कर्मचारी’ असतो, कुटुंबाचा सदस्य नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय 
मुंबई

घरकामगार ‘कर्मचारी’ असतो, कुटुंबाचा सदस्य नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

घरकामगार हा केवळ मालकाचा कर्मचारी असतो. मालकाशी कितीही जिव्हाळा असला, तरी कायद्याच्या नजरेत तो वारस ठरू शकत नाही.

Swapnil S

मुंबई : घरकामगार हा केवळ मालकाचा कर्मचारी असतो. मालकाशी कितीही जिव्हाळा असला, तरी कायद्याच्या नजरेत तो वारस ठरू शकत नाही. घरकामगार हा कुटुंबाचा सदस्य नसतो, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

दक्षिण मुंबईतील गावदेवी परिसरातील शंकर भवन इमारतीमधील सदनिकेबाबत हा वाद होता. पी. एस. आठवणकर हे घराचे मूळ भाडेकरू होते. शांताराम गुजर हे त्यांच्याकडे १९४८ पासून पूर्णवेळ घरकामगार म्हणून काम करत होते. १९८५मध्ये आठवणकर यांच्या निधनानंतर गुजर यांनी त्या घरावर भाडेकरू म्हणून आपला हक्क सांगितला. मात्र, हा दावा न्याायालयाने फेटाळून लावला.

कुटुंबाच्या व्याख्येत रक्ताची, कायदेशीर नातीच बसतात

महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार, कुटुंब या व्याख्येत केवळ रक्ताची नाती किंवा कायदेशीर विवाहातून निर्माण झालेली नातीच येतात. घरकामगार हा केवळ मालकाचा कर्मचारी असतो. मालकाशी कितीही जिव्हाळा असला, तरी कायद्याच्या नजरेत तो वारस ठरू शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरती साठे यांच्या खंडपीठाने नोंदवले. दरम्यान, गुजर पती-पत्नीला ती सदनिका रिकामी करण्यासाठी ८ आठवड्यांची मुदत दिली आहे.

कसारा मार्गावर १५ तासांचा ब्लॉक; आज आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल राहणार बंद

Mumbai : बुलेट ट्रेन भूसंपादन नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा; गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Mumbai : लोकल प्रवासात फेरीवाल्यांची अधिकृत एन्ट्री? पश्चिम रेल्वेकडूनही हालचाली सुरू; मात्र प्रवाशांकडून तीव्र विरोध

खारेगाव खाडी उड्डाणपूल खुला होणार; ठाणे-मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीला दिलासा

सातव्या महिन्यात गर्भपाताला परवानगी; अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केला अपवाद