‘डरो मत...जे होणार ते होणारच; भास्कर जाधवांचा ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात संग्रहित छायाचित्र
मुंबई

‘डरो मत...जे होणार ते होणारच; भास्कर जाधवांचा ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

ठाकरे शिवसेना पक्षातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘डरो मत, बिलकुल डरो मत... जो होनेवाला वो होनेही वाला है’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला.

Swapnil S

मुंबई : ठाकरे शिवसेना पक्षातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘डरो मत, बिलकुल डरो मत... जो होनेवाला वो होनेही वाला है’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. तसेच पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे दिवसही जातील; नवसंजीवनी देण्याची वेळ

भास्कर जाधव म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगेन की, डरो मत, बिलकुल डरो मत... चिंता करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे. मात्र, हे दिवसही निघून जातील. त्यासाठी आता काही कार्यक्रम आखावे लागतील, काही ठोस निर्णय घ्यावे लागतील आणि पक्षाची पुढील भूमिका निश्चित करावी लागेल’. त्यांनी सूचक शब्दांत संघटनात्मक बदलांचीही गरज व्यक्त केली. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी नेतृत्वाने काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांपासून अफवांचे राजकारण सुरू’

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सातत्याने उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटणार, खासदार वेगळा गट स्थापन करणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. ‘आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पण सत्तेइतकीच समाजातील विश्वासार्हता महत्त्वाची असते. आज हा पक्ष फोडणार, उद्या तो पक्ष फोडणार, अशा चर्चा सातत्याने घडवल्या जात आहेत. दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेऊन पक्षाची सूज वाढवता येईल; पण त्यामुळे समाजातील प्रतिष्ठा आणि विश्वास वाढत नाही’, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Mumbai : लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा

काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेश