मुंबई

दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

प्रतिनिधी

दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले असून त्यांनी २०हून अधिक पुस्तेके लिहिली आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी काहीकाळ काम केले होते.

डॉ. विश्वास मेहेंदळे हे दिल्ली आकाशवाणीवरुन पहिले मराठी बातम्या वाचणारे निवेदक ठरले. तसेच, ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही होते. त्यांनी मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच, अभिनयामध्येदेखील त्यांनी काम केले असून अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 'मला भेटलेली माणसे' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम चांगलाच गाजला होता. त्याचदरम्यान, दूरदर्शनवर असलेला 'वाद संवाद' हा कार्यक्रम त्यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. 'यशवंतराव ते विलासराव', 'आपले पंतप्रधान' यासारखे १८हून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र

'इराणसोबत व्यापारी करार केल्यास...', चाबहार बंदर करारानंतर अमेरिकेचा भारताला इशारा