मुंबई

ईस्टर्न फ्री-वेची देखभाल-दुरुस्ती पालिका ३८ कोटी खर्च करणार

ईस्टर्न फ्री-वे ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाने सर्वेक्षण केले आणि पुलाच्या खांबावरील पेडेस्टेलचे नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे हे उथळे व बेअरिंगमुळे पुलाचे इतर भाग पिअर कॅप, पीएसपी सेगमेंटल बॉक्स गर्डर यांच्यावरील बांधकामाच्या ताणात वाढ होऊ नुकसान होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या ईस्टर्न फ्री-वेची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात पुलाच्या खांबावरील पेडेस्टलमध्ये तडे आढळल्याने बेअरिंग बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका ३८ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ईस्टर्न फ्री महामार्गाचे बांधकाम एमएमआरडीने सन २०१४ मध्ये पूर्ण केले. या ईस्टर्न फ्री-वेच्या कामांसाठी एमएमआरडीएने बांधलेल्या सिम्प्लेक्स इन्फास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड केली. या कंपनीने काम पूर्ण करून दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पूर्व मुक्त मार्ग एमएमआरडीएने जिथे आहे जसा आहे, या तत्त्वावर पालिकेला दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केला होता. ईस्टर्न फ्री-वे ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाने सर्वेक्षण केले आणि पुलाच्या खांबावरील पेडेस्टेलचे नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे हे उथळे व बेअरिंगमुळे पुलाचे इतर भाग पिअर कॅप, पीएसपी सेगमेंटल बॉक्स गर्डर यांच्यावरील बांधकामाच्या ताणात वाढ होऊ नुकसान होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मॉरर सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराने उणे २५ टक्के दराने बोली लावत विविध करांसह ३८.३१ कोटी रुपयांमध्ये हे मिळवले आहे.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब