संग्रहित छायाचित्र 
मुंबई

अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ! ३ हजार कोटींची संपत्ती जप्त

अनिल अंबानी यांच्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली.

Swapnil S

मुंबई : उद्योजक अनिल अंबानी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली.

अनिल अंबानी यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील पाली हिल येथील बंगला, दिल्लीमधील रिलायन्स सेंटरचे कार्यालय त्याचबरोबर दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि गोदावरीमधील संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपनीवर कथित फसवणुकीत ईडीने कारवाई केली. दिल्लीतील हॉटेल रणजीत येथे असलेले रिलायन्स सेंटरही जप्त करण्यात आले आहे.

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू

लाऊडस्पीकर लावा, पण नियमांचे पालन करा! समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन, बाप्पाच्या उंचीबाबत तज्ज्ञांची नियुक्ती करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन