मुंबई

एक है तो सेफ है: मलबार हिलमध्ये आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या 'एकता रॅली'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra assembly elections 2024: आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडून स्मृतिदिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Swapnil S

आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडून स्मृतिदिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, १७ नोव्हेंबर : मलबार हिल मतदारसंघाचे आमदार आणि येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सदर मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे आज 'एकता रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते ऑपेरा हाऊस असा या रॅलीचा मार्ग होता. आमदार मंगल प्रभात लोढा आपल्या कुटुंबासह या रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सुद्धा उपस्थित होते. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे, हा या रॅलीच्या आयोजनामागचा उद्देश होता.

प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार लोढा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक हैं तो सेफ हैं असं सांगितलं आहे आणि त्याचे महत्व आपण सर्वच जाणतो. देशासाठी आपण सर्व एकत्र आलो, तर सुरक्षित राहून प्रगती करू देशविघातक घटकांना रोखू शकू."

त्याशिवाय आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळास भेट देऊन आमदार मंगल प्रभात लोढा यांनी अभिवादन केले. "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे आणि लाखो हिंदूंचे प्रेरणास्रोत आहेत. आजही त्यांच्या शिकवणीनुसारच समाजसेवेचे कार्य करत आहोत. त्यांना स्मृतिदिनानिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो!" असे यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवायची नाही; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानानंतर खळबळ

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

BARC च्या बनावट वैज्ञानिकाला अटक; अणूबॉम्बच्या आराखड्यासह सुरक्षा भंगाचा संशय