गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई  
मुंबई

फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीकडून धमकी; ५५ लाखांसाठी धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

माझगाव परिसरात राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीकडून धमकी देण्यात आली आहे. अपूर्वाचे ५५ लाख रुपये सात दिवसांत परत कर नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : माझगाव परिसरात राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीकडून धमकी देण्यात आली आहे. अपूर्वाचे ५५ लाख रुपये सात दिवसांत परत कर नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकणी शिवडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरू आहे. ४२ वर्षांचे तक्रारदार फॅशन डिझायनर असून ते सध्या माझगाव डॉक परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ३० ऑगस्टला त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावर कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तो बिष्णोई टोळीकडून बोलत असल्याचे सांगून त्याच्याकडून अपूर्वा यांचे त्याला ५५ लाख रुपये देणे बाकी आहे. सात दिवसांत ही रक्कम देऊन टाक, सात दिवसानंतर पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील. आमच्या नादी लागू नकोस, तुला तुझ्या जिवाची पर्वा आहे ना. मग लवकरच अपूर्वीशी बोलून घे, अशी धमकी दिली.

गेल्या काही दिवसांत बिष्णोई टोळीने मुंबई शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार आणि वांद्रे येथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्घीकी यांची हत्या या दोन्ही घटनेमागे बिष्णोई टोळीचा सहभाग उघडकीस आला होता. तक्रारदार या घटनांनी प्रचंड घाबरले व त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

'तुला तुझ्या जिवाची पर्वा आहे ना'

सात दिवसांत ही रक्कम देऊन टाक, सात दिवसानंतर पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील. आमच्या नादी लागू नकोस, तुला तुझ्या जिवाची पर्वा आहे ना. मग लवकरच अपूर्वीशी बोलून घे, अशी धमकी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी