Mumbai : धारावीत पहिली घरे २०२८ पर्यंत  
मुंबई

Mumbai : धारावीत पहिली घरे २०२८ पर्यंत

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करून मार्च २०२८ पर्यंत लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

Swapnil S

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करून मार्च २०२८ पर्यंत लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. या टप्प्यात किमान दहा हजार घरे तयार करून पात्र रहिवाशांना हस्तांतरित करण्याचा सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले.

या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि परवानग्या जलद मिळण्यासाठी 'सिंगल-विंडो' प्रणाली लागू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

प्रकल्पांतर्गत धारावीतील पुनर्वसन इमारती ४२ महिन्यांत, तर माटुंग्यातील पुनर्वसन काम ३९ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईला एक नवी जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द