मुंबई

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑगस्ट रोजी मासेमारी बोटींसाठी नवीन मसुदा जाहीर केला. या मसुद्यानुसार भारतीय जलधी क्षेत्राबाहेर मासेमारीसाठी लेटर ऑफ ॲथॉरिटी (एलओए) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक मासेमारी बोटीला तब्बल २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे.

Swapnil S

भाईंंदर : केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑगस्ट रोजी मासेमारी बोटींसाठी नवीन मसुदा जाहीर केला. या मसुद्यानुसार भारतीय जलधी क्षेत्राबाहेर मासेमारीसाठी लेटर ऑफ ॲथॉरिटी (एलओए) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक मासेमारी बोटीला तब्बल २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. या अटीमुळे पारंपरिक व लहान मच्छीमार बोट मालकांना खोल समुद्रात मासेमारी करणे कठीण होणार असून मोठ्या खासगी कंपन्यांना मात्र सहज प्रवेश मिळेल, असा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी या मसुद्याला तीव्र विरोध दर्शवला असून लहान मच्छीमारांवर अन्याय होत असल्याचे सांगितले.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने प्रारूप मसुद्यावर हरकती व सूचना दाखल करताना भारतीय जलधी क्षेत्रातील खोल समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमार सहकारी संस्था व पारंपरिक मच्छीमारांनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच एलओए अंतर्गत २५ लाखांची बँक गॅरंटीची अट पारंपरिक मच्छीमारांसाठी रद्द करावी, एकूण एलओएपैकी २५ टक्के एलओए पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव ठेवावेत, अर्ज शुल्कावर ७५ टक्के अनुदान द्यावे, खोल समुद्रातील सुरक्षितता, शीतसाखळी, इंधन पुरवठा व मदर वेस्सेल संचालनासाठी राज्यस्तरीय सहकारी संस्थांना परवानगी द्यावी, अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटींवर कठोर दंड व फौजदारी कारवाईची तरतूद करावी, खोल समुद्रातील मासेमारीसाठी वेगळे बंदर व नेव्हिगेशनल चॅनेल तयार करावे आणि मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन व्हावे, अशा सूचना समितीने दिल्या आहेत.

मसुद्यातील तरतुदींमुळे देशातील लहान मच्छीमार भांडवलदारांच्या तावडीत सापडू नयेत. त्यामुळे समितीने दाखल केलेल्या सूचनांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा लहान मच्छीमारांचा व्यवसाय व रोजगार धोक्यात येईल. - बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; माऊंट एव्हरेस्टजवळ लँडिंगवेळी मोठी दुर्घटना, एका भारतीयाचा मृत्यू, थरारक Video व्हायरल

बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपरचे भाडे ६० ते ९५ टक्के अधिक; वेळ सहा तासांनी वाचणार, एसी थ्री टियरचे भाडे २,८१० रुपये

कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; नियमित, विशेष गाड्यांची कोंडी

पालघर : वाढवण बंदराविरोधात संताप; ग्रामस्थांचे समुद्रात जलसमाधी आंदोलन

टाटा ट्रस्टमधील वाद; मतभेद सामोपचाराने मिटवावेत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन