नवजात शिशूंच्या मृत्युदरात घट; उपचारांच्या गुणवत्तेत वाढ, आरोग्य सेवेचे बळकटीकरण  
मुंबई

नवजात शिशूंच्या मृत्युदरात घट; उपचारांच्या गुणवत्तेत वाढ, आरोग्य सेवेचे बळकटीकरण

नवजात शिशूंच्या मृत्युदरात घट, उपचार सेवांची गुणवत्तेत वाढ आणि पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : नवजात शिशूंच्या मृत्युदरात घट, उपचार सेवांची गुणवत्तेत वाढ आणि पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील नवजात शिशूंना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनआयसीयू व्यवस्थापन, सीएसआर उपक्रम आणि ऑनलाइन डॅशबोर्ड सादरीकरण तसेच बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुरोगतज्ज्ञ यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील एनआयसीयू सुविधांचे सक्षमीकरण, नवजात शिशूंना अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सीएसआरच्या माध्यमातून वैद्यकीय पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उभारणी, तसेच रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थापन अधिक पारदर्शक, प्रभावी आणि कार्यक्षम करण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील तज्ज्ञांनी नवजात शिशूंच्या आरोग्य सेवेतील सध्याच्या आव्हानांवर मार्गदर्शन केले.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

जरांगे माघारीचे नाट्य, पडद्याआडच्या कुरापती....!

आजचे राशिभविष्य, २१ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नऊवारी, नथ अन् मराठमोळा साज; माधवी निमकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हाताने ते चमच्याने