मुंबई

नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

आपल्या घरी किंवा सोसायटीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

Krantee V. Kale

लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही तासच शिल्लक राहिले आहेत. उद्या बुधवारी (दि.२७) वाजत-गाजत गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ति यांच्या संयुक्त विद्यमाने 'इको-गणेश बीएमसी पुरस्कार २०२५' ही खास स्पर्धा आणली आहे. या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे.

आपल्या घरी किंवा सोसायटीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. FPJ Eco Ganesha BMC Awards 2025 हा पुरस्कार म्हणजे पर्यावरणाप्रती तुमची चिंता व्यक्त करण्याचा आणि सण अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाईल. या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि रेड एफएम ९३.५ हे देखील भागीदार आहेत. स्पर्धेत घरगुती आणि गृहनिर्माण संस्थांमधून २० भाग्यवान विजेत्यांची निवड मान्यवर परीक्षकांमार्फत केली जाईल. विजेत्यांना मुंबई मनपाकडून खास पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार दिनाची घोषणा FPJ आणि नवशक्तीकडून लवकरच केली जाईल.

सहभागी कसे व्हावे?

- "FPJ ECO Ganesha" असे टाइप करुन 7718008037 या क्रमांकावर फोटो व्हॉट्सअ‍ॅप करा.

- तुम्ही #FPJEcoGanesha असे ट्विट करुन आणि @fpjindia या आमच्या ट्विटर हँडलला टॅग करुनही स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

- तुम्ही येथे क्लिक करुनही आम्हाला थेट फोटो पाठवू शकता.

- वरील फोटोमधील क्यूआर कोड स्कॅन करुनही तुम्ही सहभागी होऊ शकता.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले