मुंबई

विद्या बालनच्या नावाने फेक अकाऊंट, अज्ञात व्यक्तीकडून फसवणूक; अभिनेत्रीने दाखल केला FIR

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती तिला सांगितली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या परिचित लोकांनी अशाच प्रकारे कॉल करून माहिती दिली होती.

Swapnil S

मुंबई : सिने अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावाने बोगस अकाऊंट उघडून अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सिनेसृष्टीतील स्टायलिश प्रणय हे विद्या बालनचे मित्र असून, १६ जानेवारीला त्यांनी तिला फोन केला होता. यावेळी त्याने तिला त्याच्या व्हॉट्सॲपवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून तो विद्या बालन बोलत असून, कामासंदर्भात चर्चा करायची आहे, असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती तिला सांगितली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या परिचित लोकांनी अशाच प्रकारे कॉल करून माहिती दिली होती. अज्ञात व्यक्तीने विद्या डॉट बालन प्रायव्हेट असे खाते उघडून बॉलिवूडमध्ये काम देण्याच्या नावाने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला होता.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले