प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

गारगाई धरण प्रकल्प महागला; २७० कोटींची वाढ, केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा; मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मुंबईकरांची रोजची पाण्याची तहान भागविण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू असून राजकीय विरोधानंतर प्रस्ताव थंडबस्त्यात गेला होता. अखेर भाजपची सत्ता मुंबई महापालिकेत येताच पुन्हा एकदा गारगाई धरण प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांची रोजची पाण्याची तहान भागविण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू असून राजकीय विरोधानंतर प्रस्ताव थंडबस्त्यात गेला होता. अखेर भाजपची सत्ता मुंबई महापालिकेत येताच पुन्हा एकदा गारगाई धरण प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३००६ कोटी ७५ लाख २७,००९ इतकी होती. मात्र, आता या प्रकल्पाचा खर्च ३२७६ कोटी ७५ लाख ९०,९३४ इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्पाच्या खर्चात २७० कोटींनी वाढ झाली आहे. तर विविध करासह या प्रकल्पाची किंमत ५३९६ कोटी ४३ लाख ९५,८१० इतकी दर्शवण्यात आली असून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा,भातसा, तुळशी व विहार या सात धरणातून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु, मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात मुंबईला ४,५०० दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील १५ वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, प्रथमच स्थायी समितीत या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

गारगाई धरण प्रकल्प हा ८४४ हेक्टर जागेवर होणार असून या धरण प्रकल्पात विविध प्रकारची एकूण ३ लाखाहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. बाधित होणारी झाडे पाहता तेवढ्याच नवीन झाडांचे रोपण राज्यातील अन्य जिल्ह्यात केले जाणार असून त्यासाठी जागा निश्चित होत आहे. गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे आणि ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधणे तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयदरम्यान १.६ किमी लांबीचे जलवहन बोगद्याचे बांधकाम यासह अन्य कामे केली जाणार असून त्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून एकूण तपशीलवार अंदाजित मूळ रक्कम ३ हजार २७६ कोटी ७५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. २०२० मध्ये स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीवेळी एकूण प्रकल्प खर्च ३००६ कोटी ७५ लाख रुपये होता. मात्र, या खर्चात आता वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध कर आणि अन्य कामासहित या प्रकल्पाची एकूण किंमत ५ हजार ३९६ कोटी ४३ लाख रुपयापर्यंत गेली आहे.

असा होणार प्रकल्प (कोटीत)

  • कार्यालयीन अंदाजित रक्कम - ३००६,७५,२७,००९.००

  • कंत्राटदाराने उद्धृत केलेली रक्कम - ३३३४,४८,९९,९९९.९९

वाटाघाटीनंतर अंतिम रक्कम

  • धरणाचे बांधकाम - १७७६,२३,००,०००,००

  • अनुषंगिक कामे - १२०,००,९०,९३४.००

  • बोगद्याचे काम - ४००,१४,००,०००,००

  • पुनर्वसन व पुनर्स्थापनेचे काम १३३,३८,००,०००.००

बाधितांच्या पुनर्वसनासाठी ५०० कोटी

या धरण प्रकल्प कामात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनही असून त्याची किंमत ही ४५० ते ५०० कोटी रुपये आहे. ती यामध्ये नमूद केलेली नाही. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्च वाढणार आहे. गारगाई धरण बांधण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहे.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती