Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर  
मुंबई

Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर 

वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर येथील बेकायदा ५०० हून अधिक झोपड्यांवर पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत बुलडोझर फिरवण्यात आला. आता गरीबनगरच्या त्या जागेवर स्वतंत्र रिक्षा मार्गिका व स्टँड उभारण्यात येणार आहे. तसेच गरीबनगर ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यत उन्नत मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर येथील बेकायदा ५०० हून अधिक झोपड्यांवर पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत बुलडोझर फिरवण्यात आला. आता गरीबनगरच्या त्या जागेवर स्वतंत्र रिक्षा मार्गिका व स्टँड उभारण्यात येणार आहे. तसेच गरीबनगर ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यत उन्नत मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.

पालिकेच्या या निर्णयामुळे वांद्रे पूर्वेकडील वाहतूककोंडी फुटणार असून परिसराचा कायापालट होणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा करून पालिका पुढील निर्णय घेणार आहे. याबाबतचा एच पूर्व विभागाने तयार केलेला प्रस्ताव पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी बीकेसी, म्हाडा वसाहत, सरकारी कॉलनी, भारतनगर तसेच अन्य भागांकडे प्रवास करतात. मात्र बसस्थानक आणि रिक्षांची एकत्रित गर्दी होत असल्याने परिसरात सतत वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच शेअर रिक्षाचालकांची दादागिरी यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एच पूर्व विभागाने वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर तीन स्वतंत्र रिक्षा मार्गिका आणि स्टँड उभारण्याचे नियोजन केले आहे. स्वतंत्र रिक्षा मार्गिका आणि स्टँड उभारल्यानंतर प्रवासी व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, गरीबनगर येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने स्वतंत्र रिक्षा मार्गिका व स्टँड उभारण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

दुसऱ्या टप्प्यात गरीबनगर परिसरातून पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उन्नत मार्ग उभारण्याची संकल्पना राबवण्याचा निर्णय एच पूर्व विभागाने घेतला आहे. रेल्वेच्या जागेवरील झोपड्या हटवल्यानंतर उपलब्ध झालेल्या मोकळ्या जागेचा उपयोग या प्रकल्पासाठी केला जाणार आहे. गरीब नगर ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यतचा उन्नत मार्ग न्यायालय, महावितरण कार्यालय तसेच बीकेसी परिसराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग भविष्यात पर्यायी दुवा ठरू शकतो. 

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता