मुंबई

स्पीड बोटीच्या स्टेअरिंग, थ्रोटलमध्ये त्रुटी; नौदलाच्या सूत्रांची माहिती

Gateway Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेच्या प्राथमिक तपासात नवीन माहिती उघड झाली आहे.

Swapnil S

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेच्या प्राथमिक तपासात नवीन माहिती उघड झाली आहे. स्पीड बोटीच्या स्टेअरिंग व थ्रॉटल क्वाड्रेंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळले. ही उपकरणे बोटीच्या वेगाला नियंत्रित करतात. ही बोट नौदलात सामील होण्यापूर्वी तिच्या चाचण्या सुरू होत्या. चाचणीच्यावेळी बोटीचा वेग अधिक होता. चालकाने टक्कर टाळण्याचा प्रयत्न केला. पण, बोट आयत्यावेळी दिशा बदलण्यात असमर्थ ठरली. त्यामुळे ती प्रवासी बोटीला धडकली, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.

या दुर्घटनेत बचावलेल्या स्पीड बोटीवरील व्यक्तीने सांगितले की, “टक्कर होताना स्पीड बोटीच्या चालकाला तांत्रिक बिघाडाची माहिती होती.” कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीच्या चालकाविरोधात निष्काळजीपणा, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे व दिशादर्शनाबाबत निष्काळजीपणा आदींचे गुन्हे दाखल केले.

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

निवासी जागा : व्यावसायिक वापर केल्यास जागा सील; सुप्रीम कोर्टाचे आदेश

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली