गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जेविरोधात खटला चालणार; जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला 
मुंबई

गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जेविरोधात खटला चालणार; जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला

भाजपच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे (२८) हत्याप्रकरणी वेगळी कलटणी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी केवळ पती अनंत गर्जे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून कुटुंबीयांविरोधात कोणताही पुरावा नसल्याची कबुली दिली आहे.

Swapnil S

मुंबई : भाजपच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे (२८) हत्याप्रकरणी वेगळी कलटणी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी केवळ पती अनंत गर्जे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून कुटुंबीयांविरोधात कोणताही पुरावा नसल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अनंत गर्जे याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दंतवैद्य म्हणून कार्यरत असलेल्या गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे (२८) हिने गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली . गौरी आणि गर्जे यांचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्याने गौरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.अनंत गर्जे याला अटक केले. दरम्यान गर्जे याची बहीण शीतल गर्जे-अंधाळे आणि भाऊ अजय गर्जे यांना कनिष्ठ न्यायालयाने याआधीच अटकपूर्व जामीन मंजूर केला. मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास पूर्ण करून गर्जे याची बहीण शीतल गर्जे-अंधाळे आणि भाऊ अजय गर्जे यांना क्लीनचिट देत अनंत गर्जे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार