मुंबई

दुरुस्तीसाठी मोबाईल देणे तक्रारदाराला महागात

नवशक्ती Web Desk

मुंबई : एफडी तोडून पैशांचा अपहार करणाऱ्या कटातील तिसऱ्या आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. अब्दुल अहमद अब्दुल नबी शेख असे या आरोपीचे नाव असून, तो या गुन्ह्यांत गेल्या एक वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार या दोघांना अटक केली होती. दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल आरोपींच्या स्वाधीन करणे तक्रारदाराला चांगलेच महागात पडले होते. पंकज अशोक कदम हा साकिनाका परिसरात राहतो. त्याच्याकडे एक ओपो मोबाईल होता. त्याचा स्पिकर खराब झाला होता. त्यामुळे ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी त्याने त्याचा मोबाईल फोन दुरुस्तीसाठी डीटीके कंपाऊंडच्या एबीएस मोबाईल हॅब दुकानात दिला होता. यावेळी त्याला सौरभने दुसऱ्या दिवशी येऊन मोबाईल घेऊन जा असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी तो दुकानात गेल्यानंतर शुभमने सौरभ हा बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याला त्याचा मोबाईल दोन दिवसांनी मिळेल, असे सांगितले. दोन दिवसांनी पुन्हा दुकानात आल्यानंतर त्याने त्याला मोबाईल देण्यास टाळाटाळ केली होती. हा प्रकार त्याला संशयास्पद वाटला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याने साकिनाका पोलिसांना ही माहिती दिली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस