मुंबई

अहवालानंतरच गोखले, बर्फीवाला पूल जोडणी; आयआयटी आणि व्हीजेटीआयकडून पाहणी

व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पुलाच्या जोडीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबत आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागवण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआयने रविवारी गोखले पुलाची पाहणी केली. पुढील आठवड्यात आयआयटी, व्हीजेटीआय व मुंबई महापालिकेची बैठक होणार असून पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा निर्णय मार्गी लागेल, असा विश्वास मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

धोकादायक झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबर २०२३ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर पुलाचे काम सुरू असून गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण २६ फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता. त्यानुसार व्हीजेटीआयने आपला अहवाल पालिकेला सादर केला आहे.

व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे. तरीही आयआयटी मुंबईकडून याबाबत रिपोर्ट मागवला असून रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’