Mumbai : ३५ वर्षांनंतर गोराई-मनोरीचा नव्याने विकास आराखडा; २१ हजार घरांसह ७०० एकरांवरील रिसॉर्ट्सचे भवितव्य ठरणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : ३५ वर्षांनंतर गोराई-मनोरीचा नव्याने विकास आराखडा; २१ हजार घरांसह ७०० एकरांवरील रिसॉर्ट्सचे भवितव्य ठरणार

गोराई-मनोरी आणि उत्तन परिसराचा विकास आराखडा तब्बल ३५ वर्षांनंतर बदलण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. सुमारे १७.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या परिसरासाठी नवीन विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला असून, नागरिकांकडून ६० दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : गोराई-मनोरी आणि उत्तन परिसराचा विकास आराखडा तब्बल ३५ वर्षांनंतर बदलण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. सुमारे १७.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या परिसरासाठी नवीन विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला असून, नागरिकांकडून ६० दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या नव्या आराखड्यामुळे परिसरातील २१ हजारांहून अधिक घरांचा, तसेच ७०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या रिसॉर्ट्स, बंगले व फार्म हाऊसचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

१९८३ मध्ये जारी करण्यात आलेल्या सरकारी शासन निर्णयानुसार गोराई-मनोरी परिसरातील मोठा भाग अविकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आला होता. या निर्बंधांमुळे नवीन बांधकामांवर मर्यादा आल्या. स्थानिक रहिवाशांना त्यांच्या जुन्या वडिलोपार्जित घरांची दुरुस्ती करतानाही परवानग्यांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र याच परिसरात कालांतराने मोठे रिसॉर्ट्स, बंगले आणि फार्महाऊस उभे राहिले. एस्सेल वर्ल्ड, ग्लोबल विपश्यना पॅगोडा आणि सन बीच रिसॉर्ट यांसारख्या प्रमुख ठिकाणांमुळे या भागात पर्यटनविकासाला चालना मिळाली. परंतु, अविकास क्षेत्रातील बांधकामे, कांदळवनांवरील अतिक्रमणे आणि किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी