मुंबई

गोरेगाव शौचालयात वायू गळती मृत्यू प्रकरण : इलेक्ट्रोप्लेटिंग कंपनीच्या मालकाला उत्तर प्रदेशातून अटक

गोरेगाव पूर्व येथे गटारात बेकायदेशीरपणे अत्यंत विषारी रसायने सोडून दोघा तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी फरार असलेल्या ४५ वर्षीय आरोपीला अखेर वनराई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

गोरेगाव पूर्व येथे गटारात बेकायदेशीरपणे अत्यंत विषारी रसायने सोडून दोघा तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी फरार असलेल्या ४५ वर्षीय आरोपीला अखेर वनराई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. रामधनी यादव असे इलेक्ट्रोप्लेटिंग या कंपनीच्या मालकाचे नाव असून गेल्या पाच दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते.

गोरेगाव पूर्वेतील राम मंदिर रोडवर 'साई इलेक्ट्रोप्लेटर्स' नावाने कंपनी चालवणारा आरोपी रामधनी यादव याला जौनपूर येथील एका नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. २७ सप्टेंबरला गोरेगाव येथील एका सार्वजनिक सुलभ शौचालयात प्रभाकर धिवर (२४) आणि भाविक देसाई (१८) या दोन तरुणांचा विषारी वायूबाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात सहआरोपी असलेला घरमालक नवीनचंद्र चावडा- ज्याने यादवला ही जागा भाड्याने दिली होती. चावडा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

घटना नेमकी काय?

आरोपी रामधनी यादव याच्या कामगारांनी हायड्रोक्लोरिक आणि सल्फ्युरिक अॅसिडयुक्त अत्यंत धोकादायक विषारी कचरा आणि रसायने ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये सोडली होती. जमिनीखाली या रसायनांमध्ये रासायनिक रिऑक्शन होऊन राम मंदिर पूर्व येथील पारसी पंचायत गेट आणि मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळील सार्वजनिक शौचालयात अत्यंत विषारी वायू पसरला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश